Posts

Showing posts from October, 2019

काहीही

Image
बाल  हट्टापुढे  मोठे मोठे हात टेकतात, तिथे माझ्या शब्दांचे काय चालणार ?  रुसव्याफुगव्यातून मनधरणी करूनही भाचीने मौनाकडे कूच केल्यावर माझ्या भरकटलेल्या शब्दांचा पसारा इतस्ततः पसरला.  तुझ्या हसण्यावर एक कविता  तुझ्या रडण्यावर एक कविता  रुसून कोपऱ्यात बसून  तुझ्या फुरंगटण्यावर  एक कविता  तुला मनवायला एक कविता  तुला रमवायला एक कविता  बिघडलेला तुझा सूर  परत आणायला एक कविता  वाटलं नव्हतं कधी पण  अशीही वेळ येईल  मन माझं वेडावून  तुझ्या मौनावरही कविता लिहिल मैत्रीचा हात सोडवून  या कवीच्या पिशवीत  फकिरी ओतण्याच्या तुझ्या स्वभावावर  ही घे एक कविता  पौर्णिमा ढेरे 

तू -२

Image
आकाश या कवितेप्रमाणे तू या कवितेचेदेखील आफ्टर इफेक्ट होतेच. आफ्टर इफेक्ट भूकंपानंतरच्या त्सुनामीसारखेच असतात असे नाही. माझ्या पहिल्या शब्दसखींच्या ताटातुटीच्या कल्पनेनेच सुचलेल्या 'तू' या कवितेचा आफ्टर इफेक्ट बहिणीला लग्नानंतर चिडविण्यासाठी साकार झाला. तू गेलीस अन                अर्ध्या डेअरी मिल्कवर कुणाचा हक्क राहिला नाही.  तू गेलीस अन                 वेफर्सचा पूर्ण पुडा माझा झाला.  तू गेलीस अन                 संध्याकाळसाठी ठेवलेलं डब्यातलं बिस्कीट अचानक संपणं बंद झालं! तू गेलीस अन                 पसारा टाकला तरी ओरडणारं कुणी उरलं नाही.   तू गेलीस अन                 घराचा कानाकोपरा माझ्या साम्राज्याखाली आला.   तू गेलीस अन                 हा ड्रेस का...

घाट

Image
काही काळ मुंबईत राहिल्याने पुणे मुंबई प्रवास पाचवीला पुजल्यासारखा वाटला तरी जिथे पाचवी झाली तो लोणावळ्याच्या घाट आजही नव्या प्रेरणा व विचार देतो आणि मन उल्हसित करतो.  'लोणावळा सोडलं ग ' असं आईला सांगून फोन बंद केला. साहजिकच मन शाळेतल्या गमती जमतीत हरवलं. गाडी हळूहळू घाट उतरू लागली अन शाळेतली कविता आठवली.  घाटातली वाट काय  तिचा थाट  गिरकते  मुरकते लवते पाठोपाठ  निळी निळी परडी कुणी केली पालथी.  पानं फुलं सांडली वरती आणि खालती  खाली खोल दरी वर उंच कडा  भला मोठा नाग जणु उभा काढून फणा ....  बसमधला प्रत्येक माणुस याच निरागसतेने माना उंचावून खिडकीतून घाट बघण्याची धडपड करत होता. निसर्गाच्या त्या उदात्त देणगीला डोळ्यात दडवून नेऊ पहात होता.  हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट   सांगो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट  हिरव्या हिरव्या sssss  लगेच हे गाणेही आठवले अन खंडाळ्याच्या घाटाच्या कैक वर्षांपासूनच्या प्रसिद्धीची खुणगाठ पटली.  किशोरवयापासून घाट मला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायचा. जस...

गोष्ट तुझी अन माझी

Image
  परिपूर्णतेच्या प्रवासात तुमचा जोडीदार हा तुमचा सच्चा साथीदार असतो. संसाराच्या रोलर कोस्टरचा थरार  तुम्ही सोबत अनुभवता. एकत्रच हेलपांडता, उल्हसित होता. एक डगमगला दुसरा सावरतो. अशानेच तर संसार अर्थपूर्ण होतो. अशी ही  या राजाराणीची गोष्ट, बघा आवडतेय का?       गोष्ट तुझी अन माझी  नव्हती कधीच दोघांची  प्रारंभातच घातली  सांगड ती प्रत्येकाशी !१!   राजाराणीचा संसार  मिळे बिरुद साभार  दिला घरकुला आकार  करून सर्वांचा विचार !२!   काड्या काड्या जमवून  छोटे घरटे बांधावे  टुमदार हवेल्यांची  आस नच मनी शिवे !३!   बदलत्या ह्या ढंगात  नच रंगलो नवरंगात  पसरलीही ओसरी  ओळखूनच पायरी !४!   फक्त होती अपेक्षाही  घ्यावे सर्वांनी समजून  नको नको हारतुरे  घ्यावे फक्त सामावून !५!   मिळो सावली अशीही  घनदाट त्या वडाची  बळ मिळे जिच्याठायी  उंच घ्याया भरारी ती !६...