काहीही

बाल  हट्टापुढे  मोठे मोठे हात टेकतात, तिथे माझ्या शब्दांचे काय चालणार ?  रुसव्याफुगव्यातून मनधरणी करूनही भाचीने मौनाकडे कूच केल्यावर माझ्या भरकटलेल्या शब्दांचा पसारा इतस्ततः पसरला. 




तुझ्या हसण्यावर एक कविता 
तुझ्या रडण्यावर एक कविता 
रुसून कोपऱ्यात बसून 
तुझ्या फुरंगटण्यावर  एक कविता 

तुला मनवायला एक कविता 
तुला रमवायला एक कविता 
बिघडलेला तुझा सूर 
परत आणायला एक कविता 

वाटलं नव्हतं कधी पण 
अशीही वेळ येईल 
मन माझं वेडावून 
तुझ्या मौनावरही कविता लिहिल

मैत्रीचा हात सोडवून 
या कवीच्या पिशवीत 
फकिरी ओतण्याच्या तुझ्या स्वभावावर 
ही घे एक कविता 

पौर्णिमा ढेरे 

Comments