तू -२


आकाश या कवितेप्रमाणे तू या कवितेचेदेखील आफ्टर इफेक्ट होतेच. आफ्टर इफेक्ट भूकंपानंतरच्या त्सुनामीसारखेच असतात असे नाही. माझ्या पहिल्या शब्दसखींच्या ताटातुटीच्या कल्पनेनेच सुचलेल्या 'तू' या कवितेचा आफ्टर इफेक्ट बहिणीला लग्नानंतर चिडविण्यासाठी साकार झाला.





तू गेलीस अन 
              अर्ध्या डेअरी मिल्कवर कुणाचा हक्क राहिला नाही. 
तू गेलीस अन 
               वेफर्सचा पूर्ण पुडा माझा झाला. 
तू गेलीस अन 
               संध्याकाळसाठी ठेवलेलं डब्यातलं बिस्कीट अचानक संपणं बंद झालं!



तू गेलीस अन 
               पसारा टाकला तरी ओरडणारं कुणी उरलं नाही.  
तू गेलीस अन 
               घराचा कानाकोपरा माझ्या साम्राज्याखाली आला.  
तू गेलीस अन 
               हा ड्रेस का घातला ही चौकशी कुणी करेना झालं!



तू गेलीस अन 
              अख्खी  'M80' माझ्या हातात आली 
चालवता येत नसेना का, 
               मी गाडीवाले झाले 
तू गेलीस अन 
             कामाबद्दलचे कडू डोस बंद झाले !


हाय ! तू गेलीस अन 
             माझ  जीवन कस सुसह्य झाल आहे!!

पौर्णिमा ढेरे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Perfectly imperfect?

दृष्टिकोन