तराणे



तरुंवर उमलत्या हळव्या नि कोमल
फुलोऱ्या परी हे तराणे फुलावे

नभाशी बिलगत्या लडीवाळ अवखळ
चकोरा परी हे तराणे झुलावे

नि: शब्द  जळावर हळुवार गिरकत्या
तरंगा परी हे तराणे वहावे

जुन्या अत्तराच्या कुपीतुन निसटत्या
सुगंधा परी हे तराणे खुलावे

अगम्य अशाह्या अशाश्वत  पथावर
नित्य अंतरी हे तराणे रुजावे

पौर्णिमा ढेरे

Comments

  1. मस्त कविता लिहली आहे.. कवयत्री पौर्णिमा अमोद पंडित..

    ReplyDelete
  2. Mast. कवयत्री पौर्णिमा पंडित-ढेरे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Perfectly imperfect?

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Crowded Solitude