मेकिंग मोमेंट्स मॅजिकल
व्हॉट इज मॅजिक? हू इज मॅजिशियन? जादू ही एक हातचलाखी आहे, हे आता लहान मुलांपासून सगळ्यांना माहित आहे. पोतडीतून चित्रविचित्र, रंगीबेरंगी वस्तू, कधी जिवंत प्राणी बाहेर काढणारे जादूगार तर आता लहान मुलेच बनू लागली आहेत. पण जादू आणि जादूगार याबद्दलची क्रेझ काही कमी होत नाही. का बरं? जादू हा एक कम्प्लीट ड्रामा आहे, नाही का? जादुई पोतडीतून आता काय निघेल ही उत्कंठा टिकवण्याची कला, त्या एकाच act( कृती)भोवती खिळवून ठेवण्याची हातचलाखी आणि अपेक्षेपेक्षा वेगळीच गोष्ट बाहेर काढून चेहऱ्यावरील मिरॅक्युलस (विस्मयकारक) हावभावाने माणसाला आश्चर्यचकित करण्याची अदा! हो पण आश्चर्यचकित करणे म्हणजे मानसिक धक्का देणे नाही हो. बरेच जण सरप्राईज देण्याच्या नादात समोरच्या व्यक्तीच्या भावना, मानसिकता यांचा विचार करीत नाहीत. त्यामुळे ते सरप्राईज स्वीकारताना माणसाची मानसिक दमछाक होते. किंवा कित्येकदा त्या धक्क्यातून ती व्यक्ती बाहेरच येऊ शकत नाही. सरप्राईज मिळालेला क्षण हा मॅजिकल असणे अपेक्षित असते. जादुई क्षण ज्याचे विस्मरण आयुष्यात कधीच होऊ शकत नाही. An unforgettable memory. And the sum ...

मस्त कविता लिहली आहे.. कवयत्री पौर्णिमा अमोद पंडित..
ReplyDeleteMast. कवयत्री पौर्णिमा पंडित-ढेरे
ReplyDelete