Posts

Showing posts from November, 2019

अल्लाउद्दीनचा चिराग

Image
का ग करशी चिडचिड  का ग करशी रागराग? भ्रमणध्वनी नसे हा   हा तर अल्लाउद्दीनचा चिराग !१! मज हाती हा दिसता  अस्वस्थ का होतेस  लॉन्ग डिस्टन्स कॉल स्वस्त  हरपे कौटुंबिक संवाद म्हणतेस !२! भ्रमणध्वनी हा नावापुरता  भ्रमणकक्षाच कुंठवणार ! हो ना बँक, रिसेर्वशन्स, बिले  विनासायास भरून होणार !३! सोडवी डोके भंडावणारे  हर एक कूट प्रश्न  होती माहितीचे पेटारे रिते  रुजवे सामाजिक समत्व !४! व्हर्च्युअल शॉपिंग साईट्स  म्हणजे मॉल शॉप्स ना फाटा  गर्दी पार्किंग समस्याही  चालती अमूर्ततेच्या वाटा !५! किती म्हणशील तरीही  विश्व हे आभासी खोटे  रमता कृत्रिमतेच्या ठायी  तुटे पंचतत्वांशी नाते !५! चिराग  पडे ज्या हाती  तो ठरवी बदलाव  वापर सजग मनाने  समजून योग्य, अयोग्य, परिणाम !६! आज असे तुजसाठी  मित्र मार्गदर्शक तत्वज्ञ  ठेव डोळसपणा अन  बनू नको अनभिज्ञ !७! विधात्याची अजोड करणी  करती  सर्व मानवा  सलाम...

शोध - २

Image
काळाच्या खोल डोहात, आठवणींच्या अथांग गर्तेत,  जखमांच्या धडकणाऱ्या लाटांत, भग्न स्वप्नांच्या काळोखणाऱ्या आसमंतात शोधात होते तुलाच चाचपडत धडपडत !१! भास आभासांच्या फसव्या जगात,  क्षणभंगुर कवडश्यांच्या मृगजळात, जाणिवांच्या होरपळणाऱ्या वणव्यांत, भावनांमध्ये  गटांगळ्या खात, तरंगण्याच्या  फक्त अविर्भावात, परत परत, घोकत घोकत, हुडकत होते निरंतर सतत गेला  कुठे  असा अवचित  आनंदाचा ठेवा तो शाश्वत !२! होता मुलीच्या निर्मळ हास्यात  अन कोकिळेच्या मंजुळ स्वरांत  ध्येयवेड्या जिद्दी मनामनांत  सळसळणाऱ्या पानापानांत  पण नसे तो माझ्या अंतर्मनात !३! खिजवी मला लपंडावात  रांगोळीच्या अगणित रंगांत  मेहेन्दीच्या रेषारेषांत  अलवार उलगडणाऱ्या कवितांत  पण लुप्त होई क्षणार्धात !४! मित्रत्वाच्या साद साथीत  सांत्वनाच्या धीरगंभीर कवेत  चेतवणाऱ्या पाठबळात  अविचल स्थीर आधारात  प्रकटे प्रत्येक वळणावळणांत !५! बकुळीच्या फुलाच्या मादक गंधात  ...

हार - जीत

Image
हार आणि जीत.  आयुष्यातील सर्वात महत्वाच्या पायऱ्या. इतक्या की त्यामुळे संपूर्ण आयुष्य एकतर कोलमडते किव्वा उभारीही घेते. एखादे जिकंलेले बिरुद मिरवताना आपली आयुष्यभराची ओळख देखील बनते. किव्वा गुणांचा  सूक्ष्म फरक आयुष्याच्या दिशेत मोठा बदलावं घडवून  कुंपणाच्या आर या पार अशी स्थिती निर्माण करतो.  मला विचाराल तर हार आणि जीत खूप व्यक्तिसापेक्ष कदाचित विरोधाभास असलेल्या गोष्टी आहेत. एका जिंकण्यामागे कदाचित कितीतरी 'हार ' दडलेल्या असतील, तर कधी एखाद्या हरण्यात मानवी मूल्यांचा विजय असू शकतो.  जिंकलेले मिरवू व हरलेले गमावू हा नियमही सपशेल खोटा ठरू शकतो. आता हेच बघाना .... षडरिपू ...ज्यांच्यावर मात करू ते अलविदा म्हणतात आणि जे आपल्यावर मात करतील त्यांना आयुष्यभर क्षणाक्षणाला मिरवत असतो. प्रत्येक बोलण्यातून त्यांची झलक समोरच्याला दिसत असते.  आजकालच्या व्यावसायिक जगात ज्या माणसांसमोर हरतो, हतबल ठरतो त्यांच्यासोबत त्यांच्या मर्जीनुसार जगावे लागते, तर कधी ज्यांच्याशी जिंकतो ते मनाला चटका लावून काळाच्या ओघात कुठल्या कुठे वाहून जातात.  पौर्णि...