अल्लाउद्दीनचा चिराग

का ग करशी चिडचिड 
का ग करशी रागराग?
भ्रमणध्वनी नसे हा  
हा तर अल्लाउद्दीनचा चिराग !१!

मज हाती हा दिसता 
अस्वस्थ का होतेस 
लॉन्ग डिस्टन्स कॉल स्वस्त 
हरपे कौटुंबिक संवाद म्हणतेस !२!

भ्रमणध्वनी हा नावापुरता 
भ्रमणकक्षाच कुंठवणार !
हो ना बँक, रिसेर्वशन्स, बिले 
विनासायास भरून होणार !३!

सोडवी डोके भंडावणारे 
हर एक कूट प्रश्न 
होती माहितीचे पेटारे रिते 
रुजवे सामाजिक समत्व !४!

व्हर्च्युअल शॉपिंग साईट्स 
म्हणजे मॉल शॉप्स ना फाटा 
गर्दी पार्किंग समस्याही 
चालती अमूर्ततेच्या वाटा !५!

किती म्हणशील तरीही 
विश्व हे आभासी खोटे 
रमता कृत्रिमतेच्या ठायी 
तुटे पंचतत्वांशी नाते !५!

चिराग  पडे ज्या हाती 
तो ठरवी बदलाव 
वापर सजग मनाने 
समजून योग्य, अयोग्य, परिणाम !६!

आज असे तुजसाठी 
मित्र मार्गदर्शक तत्वज्ञ 
ठेव डोळसपणा अन 
बनू नको अनभिज्ञ !७!

विधात्याची अजोड करणी 
करती  सर्व मानवा  सलाम 
तंत्रज्ञान हे मनुष्यासाठी 
न माणूस तंत्रज्ञानाचा गुलाम !८!

पौर्णिमा ढेरे 




Comments

Popular posts from this blog

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Perfectly imperfect?

दृष्टिकोन