हार - जीत
हार आणि जीत. आयुष्यातील सर्वात महत्वाच्या पायऱ्या. इतक्या की त्यामुळे संपूर्ण आयुष्य एकतर कोलमडते किव्वा उभारीही घेते. एखादे जिकंलेले बिरुद मिरवताना आपली आयुष्यभराची ओळख देखील बनते. किव्वा गुणांचा सूक्ष्म फरक आयुष्याच्या दिशेत मोठा बदलावं घडवून कुंपणाच्या आर या पार अशी स्थिती निर्माण करतो.
मला विचाराल तर हार आणि जीत खूप व्यक्तिसापेक्ष कदाचित विरोधाभास असलेल्या गोष्टी आहेत. एका जिंकण्यामागे कदाचित कितीतरी 'हार ' दडलेल्या असतील, तर कधी एखाद्या हरण्यात मानवी मूल्यांचा विजय असू शकतो.
जिंकलेले मिरवू व हरलेले गमावू हा नियमही सपशेल खोटा ठरू शकतो. आता हेच बघाना .... षडरिपू ...ज्यांच्यावर मात करू ते अलविदा म्हणतात आणि जे आपल्यावर मात करतील त्यांना आयुष्यभर क्षणाक्षणाला मिरवत असतो. प्रत्येक बोलण्यातून त्यांची झलक समोरच्याला दिसत असते.
आजकालच्या व्यावसायिक जगात ज्या माणसांसमोर हरतो, हतबल ठरतो त्यांच्यासोबत त्यांच्या मर्जीनुसार जगावे लागते, तर कधी ज्यांच्याशी जिंकतो ते मनाला चटका लावून काळाच्या ओघात कुठल्या कुठे वाहून जातात.
पौर्णिमा ढेरे
Good thought
ReplyDeleteमोजक्याच शब्दात खूप काही सांगून जातेस..पौर्णिमा
ReplyDelete