Posts

Showing posts from August, 2018

क्यूँ?

Image
चांगुलपणाचा प्रवास व्यावहारिक  जगात टिकत नाही. आजुबाजुला दुहेरी माणसे बघितली की  सावरलेला तोल सुटतो. माणसांच्या या भाऊगर्दीत श्वासही गुदमरतो. गर्दीत असून वैराण वाटते. मनात असूनही दुहेरी माणसांचा बुरखा फाडून त्यांना उघडे  पाडता येत नाही.                         क्यूँ करते हो आप मुझसे                         कैसें हो? ये सवाल                          जब जवाब सुनने के लिए                          ना वक्त हैं ना हैं चाह         ...

मन

Image
  कधी कधी समुद्राकाठी उभे राहिल्यावर समजते कि खळबळ फक्त पहातच नाही तर अनुभवतही आहोत. लाटांच्या स्वैर धडका मनातही उलथापालथ करीत आहेत.  त्याला  बांध घालायचा प्रयत्न केला  तर उपयोग होत नाही. अशावेळेस खळबळीच्या उगमापर्यंत पोहोचून समूळ नष्ट करण्याची गरज भासते. कोणाला सापडले आहे का हो मनाचे मूळ ?   मन  मनास उमगत नाही आधार कसा शोधावा स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा श्री. सुधीर मोघे यांच्या या गाण्यात मन या संज्ञेच्या परस्परविरोधी भूमिका अधोरेखित करत मन या संकल्पनेच्या नाट्यमय अस्तित्वावर तसेच पैलूंवर प्रकाशझोत अगदी चपखल शब्दात टाकला आहे. प्रत्येक ओळीवर अंतर्मुख होऊन विचार केल्यास प्रत्येकाला स्वतःचा वेगळाच चेहरा बघायला मिळेल हे नक्की.   मनाच्या तळाचा शोध कोणाला घेता आला आहे का? मन खरंच कसं आहे हे कोणाला माहित आहे का? "सैरभैर झाला सारा वारा रानोमाळ" तसे हे मन अत्यंत चंचल अगदी बालकवींच्या श्रावणासारखं "क्षणात होते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे". ...

नातेसंबंध

Image
 मनाचे आणि व्यावहारिक विश्वच वेगळे असल्याने कधी कधी जगरहाटी स्वीकारून रुजताना काही मूलभूत संज्ञांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते. या संज्ञांची उत्पत्ती आणि उत्क्रांतीवर प्रकाशझोत पडला  तर त्या आहे तशा आजमाविण्याचे बळ  निर्माण होते. नाते जुळले मनाशी मनाचे ...... संध्याकाळच्या मंद झुळकेवर तरळणारे रेडिओवरील स्वर कानी पडले आणि मनाने त्यावर हलकेच डुलायला सुरुवात केली.   समाजशील माणसाने  आपल्या जीवनरूपी कोषात गुंफलेल्या या अनोख्या धाग्याची जाणीव नव्यानेच झाली.  माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपल्या भोवताली नात्यांचे बंध गोफत आपले जग निर्माण करीत असतो. या गोतावळ्यात कितीतरी रंगांचे अन नाना ढंगांचे असंख्य धागे विणलेले असतात. हेच ते नातेसंबंध! काही निसर्गदत्त देणगी जशी रक्ताची नाती तर काही आपणहून जोडलेले बंध जशी व्यावहारिक किंवा व्यावसायिक नाती. काही बंध सहजच जुळतात पण नैसर्गिक बंधांपेक्षाही दृढ होऊन बसतात. काही रुतणाऱ्या खुपणाऱ्या  बंधांची जाणीव नाहीशी करून टाकतात. आपल्या मनाचा बांध फोडून आपल्या जीवनाशी एकरूप होऊन जाता...

का ?

Image
जगरहाटी समजून पचवून स्थिरावण्याआधी डोक्यात अनेक प्रश्नांचे काहूर माजत असतात. सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतात असे नाही. काही प्रश्नांची उत्तरे मिळवणे जगण्यासाठी गरजेचे नसते. असे प्रश्न अनुत्तरीतच राहतात अन कालबाह्य होऊन जातात .    प्रत्येकच  नात्याचे काही नाव असते का? प्रत्येक जाणिवेचे काही अस्तित्त्व असते का? घटका जाते, पळे  जातात, तास ठणाठणा वाजत असतो काळ त्याच्या वेगाने सतत  पुढे धावत  असतो या जीवनचक्रात काही क्षणांचे खरंच मोल असते का? समुद्रात वादळ येते लाटा  किनारा ग्रासू लागतात वाटेमधील   खडकांवर थेंबांचा वर्षाव करतात या थेंबांच्या वियोगाचे समुद्रास दुःख  असते का? मनाच्या वेलीवर  हजारो पालव्या फुटतात  काही सैरावैरा धावतात, काही जागेवरच थबकतात खुरटलेल्या भावनांचे कोणाला वैषम्य असते का? पौर्णिमा ढेरे