Posts

Showing posts from July, 2018

सवय

Image
जगण्याच्या धडपडीत आपण आपल्या सवंगड्यांपासून खूप दूर जातो. तरल मनाने जगाला सामोरे जाताना खूपसे ओरखडे पडतात. त्यावर स्थितप्रज्ञतेचे आवरण चढविण्याचा केविलवाणा प्रयत्न आपण करत राहतो. मनाची भाषा  न समजणाऱ्या जगात मौनच इष्ट असे अनेकदा वाटून जाते. न कळत त्या मौनाची सवयही होऊन जाते. सवय झाली आहे आता मला मुक्यानेच राहायची मनात उमटणारे उमाळे दाटून मुक्यानेच परतायची पाऊस सुद्धा आता मला असाच खूप झुलवतो बरसण्याचे आश्वासन देऊन नुसताच गर्जत जातो प्रत्येकाची हुलकावणी का अशीच सहन करायची ? सवय झाली आहे आता मला मुक्यानेच राहायची मुके शब्द मुकी भाषा शब्दाविण  सुन्यासुन्या स्तब्ध उभ्या  मुक्या दिशा  डोळ्यांना मात्र रोज आशा  नव्या क्षितिजाची दाखवायची  सवय झाली आहे आता मला मुक्यानेच राहायची! थबकला श्वास जडावले तन  दाटलेल्या भावनांने  ओथंबले हळवे मन पावलांनी मात्र दिशा  रोज नवी धुंडाळायची  सवय झाली आहे आता मला मुक्यानेच राहायची आता मात्र  झुरणे ...

स्थित्यंतर

Image
पहिलं प्रेम ! सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय ! कारण सहसा तेच निखळ स्वरूपात अस्तित्वात असतं ! परिस्थिती, काळ, मनाच्या अवस्थांची भेसळ निदान याला प्रदूषित करत नाही. आपलं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व बदलून सकारात्मक मानसिकता रुजवणे, जगण्याची नवी उमेद निर्माण  करणं, आयुष्याला एक ध्येय, दिशा व वेग देणं आणि सर्वांविषयी सहृदयता जागृत करणं अशी किमया दाखविणारा हा जादूगार, कोणी स्वीकारो अथवा नाकारो प्रत्येक मनाच्या सांदीकोपऱ्यात ठाण मांडून बसलेला असतो. कित्येकदा जगण्याच्या धडपडीचा मूलभूत पाया असतो!                                                                                 ...

तू

Image
नव्यानेच जीवनाची सफर सुरु करताना, येणाऱ्या  रोमांचकारी किंवा जगण्याची चौकटच उलथविणाऱ्या अनुभवांना सामोरे जाताना, सहप्रवासी भेटला की प्रवास सुखकर होतो, पल्ला वाढतो, आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. पण आयुष्याच्या या टप्प्यातील प्रवासी 'एक लाट तोडी दोघा  पुन्हा नाही गाठ' या नियमाप्रमाणे आपापल्या दिशा धरतात. अन भावविश्वात पोकळी निर्माण करून जातात  .... तू आलीस अन....... माझा शब्दांशी सूर जुळला  छोटे छोटे बोल  मला बोलायला शिकविलेस  माझ्या मनाची बंद कळी  हळूहळू उलगडलीस दबलेल्या भावना समजून घेतल्यास   अडलेल्या अश्रूंना वाट दिलीस  उरात उठणारी कित्येक वादळे  तू शमवलीस  शब्दांनी दुसऱ्यांना समजावणे शिकविलेस  शब्दांनी दुसऱ्यांना समजणे शिकविलेस  पण आता तू गेलीस अन ......  माझे शब्द परत हवेत विरू लागले आहेत  किनाऱ्यावरील लाटेसारखे तिथे तिथेच  घुटमळू लागले आहेत  उगाच भिंतीवर आपटून विखरून पडतात  म्हणून शब्दांशी नातं तोडलंय ! तू गेलीस अन .......