सोबत


तुझा हात हाती सदा हा असावा
मनाचा मनाशी नको हा दुरावा

कितीही नवे गंध असले तरी पण
सुगंधी तुझा श्वास मी पांघरावा

उगा वाढता हा दिशांचा पसारा
तुझा हासरा चेहरा मी स्मरावा

सभोवार अंधारताना अचानक
तुझ्या पायरीचा दिलासा मिळावा

क्षणांती तुझी पावलेही दिसावी
मनाच्या  कळीचा फुलोरा फुलावा

पौर्णिमा ढेरे

Comments

  1. Purity of language, flawless expression. Very good read.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Perfectly imperfect?

दृष्टिकोन