नवे संदर्भ
PC: ifworlddesignguide.com
संदर्भ बदलले कि आयुष्य बदलते
नव्याने जगण्याची उभारी मिळते
नवी आव्हाने, नवी मोजमापे,
नव्या वाटा अन नवी क्षितिजे
कोऱ्या वहीचा मनमोहकसा वास
वा मिळो रंगवाया नवा कॅनव्हास
धुतलेल्या काळ्याशार कडप्प्यावर मांडायचा रोज नवा डाव
किव्वा वेगळ्याशा पायवाटेवर धुंडाळायचा नवा गाव
नव्या रंग, ढंग, चवींचे सजवावे नवेच ताट
अन बदललेल्या जीवनाचा निरखावा नवा थाट माट !!!
पौर्णिमा ढेरे

छान
ReplyDeleteNice
ReplyDelete