Posts

Showing posts from July, 2020

सोबत

Image
तुझा हात हाती सदा हा असावा मनाचा मनाशी नको हा दुरावा कितीही नवे गंध असले तरी पण सुगंधी तुझा श्वास मी पांघरावा उगा वाढता हा दिशांचा पसारा तुझा हासरा चेहरा मी स्मरावा सभोवार अंधारताना अचानक तुझ्या पायरीचा दिलासा मिळावा क्षणांती तुझी पावलेही दिसावी मनाच्या  कळीचा फुलोरा फुलावा पौर्णिमा ढेरे

नवे संदर्भ

Image
   PC: ifworlddesignguide.com संदर्भ बदलले कि आयुष्य बदलते  नव्याने जगण्याची उभारी मिळते  नवी आव्हाने, नवी मोजमापे,  नव्या वाटा अन नवी क्षितिजे  कोऱ्या वहीचा मनमोहकसा वास  वा  मिळो रंगवाया नवा कॅनव्हास  धुतलेल्या काळ्याशार कडप्प्यावर मांडायचा रोज नवा डाव  किव्वा वेगळ्याशा पायवाटेवर धुंडाळायचा नवा गाव  नव्या रंग, ढंग, चवींचे सजवावे नवेच ताट  अन बदललेल्या जीवनाचा निरखावा नवा थाट माट !!! पौर्णिमा ढेरे