Posts

Showing posts from April, 2020

तराणे

Image
तरुंवर उमलत्या हळव्या नि कोमल फुलोऱ्या परी हे तराणे फुलावे नभाशी बिलगत्या लडीवाळ अवखळ चकोरा परी हे तराणे झुलावे नि: शब्द  जळावर हळुवार गिरकत्या तरंगा परी हे तराणे वहावे जुन्या अत्तराच्या कुपीतुन निसटत्या सुगंधा परी हे तराणे खुलावे अगम्य अशाह्या अशाश्वत  पथावर नित्य अंतरी हे तराणे रुजावे पौर्णिमा ढेरे

प्रतीक्षा

Image
किती शोधले ते नवे मार्ग रे पण् पुन्हा चित्त धावे तुझ्या आठवांशी उगा रोखली पावले ही तरी पण् पुन्हा वाट थांबे तुझ्या पायरीशी अता आसवांना उमाळे फुटो अन् पुन्हा मी रमावे तुझ्या कल्पनांशी असा श्र्वास उच्छ्वास अस्थीर होता पुन्हा क्षण रुजावे तुझ्या आगमाशी अरे कालचक्रा पुन्हा चल नव्याने पुन्हा मी बनावे तुझ्यासह प्रवाशी जुन्या मार्गिकांना धुमारे फुटो अन् पुन्हा मी थिजावे तुझ्या स्थानकाशी पौर्णिमा ढेरे