प्रतीक्षा



किती शोधले ते नवे मार्ग रे पण्
पुन्हा चित्त धावे तुझ्या आठवांशी

उगा रोखली पावले ही तरी पण्
पुन्हा वाट थांबे तुझ्या पायरीशी

अता आसवांना उमाळे फुटो अन्
पुन्हा मी रमावे तुझ्या कल्पनांशी

असा श्र्वास उच्छ्वास अस्थीर होता
पुन्हा क्षण रुजावे तुझ्या आगमाशी

अरे कालचक्रा पुन्हा चल नव्याने
पुन्हा मी बनावे तुझ्यासह प्रवाशी

जुन्या मार्गिकांना धुमारे फुटो अन्
पुन्हा मी थिजावे तुझ्या स्थानकाशी

पौर्णिमा ढेरे 

Comments

  1. सुरेख काव्य रचना

    बहिणाबाई प्रमाणे मोठया विषयाचे जीवनाचे तत्वज्ञान कमी शब्दांत सहजपणे रेखाटने ही अप्रतिम प्रतिभा आपल्या अव्यक्त मधून भावली

    ReplyDelete
  2. कवितेचा अर्थ शोधता शोधता! पुन्हा फिरूनी यावे तुझ्या शब्दांवर ..अशी छान कविता

    ReplyDelete

Post a Comment