अल्पविराम!

रंजिशें जो हैं दिलकी,  बयाँ करके पुख़्ता हो चला हूँ 
यादेँ बीती सौगातें बटोरकेँ आगे चल पड़ा हूँ 

आज या ब्लॉगवरील ही चौदावी पोस्ट. साधारण ९८ सालापासून केलेल्या कविता व लेखन मी या ब्लॉग वर पोस्ट केले. प्रत्येक कवितेची वा लेखनाची पार्श्वभूमीमात्र आत्ता लिहिलेली होती. ती कविता तेव्हा तशीच का सुचली असावी याचा विचार करून ती लिहिली होती. पार्श्वभूमीखेरीज वाचता त्याचा वेगळा अर्थही  लागू शकतो. तसा तो व्यक्तिगणिकही बदलतो.

काहींनी या पोस्टमधून त्यांना भावलेला अर्थ मला कळविला. काहींनी प्रत्येक पोस्ट वर माझे कौतुक केले. काहींनी त्याच विषयावरील त्यांच्या कविता किव्वा विचार, अनुभव कथन करुन अनुमोदन दिले. त्याच जाणिवांचे नवे पैलू दाखविले. काहींनी त्यांच्या व्यक्त होण्याच्या वेगळ्या पद्धतीत जसे PAINTING आणि गाण्यांद्वारे तसेच रंग उलगडले.

काहींनी माझ्या लिखाणातून माझ्या वैचारिक बैठकीसंबधी  त्यांची मते व्यक्त केली. विषय जर गंभीर झाला तर त्यावर काहींनी नाराजी किंवा काळजीही व्यक्त केली. 
या सगळ्या अभिप्रायांच्या पद्धती मला मनापासून भावल्या, प्रोत्साहीत करून गेल्या. त्यामुळेच ब्लॉगप्रवासातील या स्थानकात थांबून सर्वांचे आभार मानावे असे वाटले. या ब्लाँगमुळे सर्वांच्या मनाशी निखळ संवाद झाला. स्थळ, काळ, वेळ, परिचय ही बंधनेही मोडित निघाली.

स्थिरावण्यापुर्वीचा जीवनप्रवास एक टप्पा पार करून गेलाय. या टप्प्यातील स्थानके परत येत नाहीत असे मुळीच नाही. पृथ्वी गोल आहे, तसेच आयुष्यही! हिस्टरी रिपीटस अगेन, फॅशन कम्स बॅक अगेन, आणि  माझा ब्लॉगप्रवासही होईलच, पुन्हा  तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तुमच्या उस्फुर्त दाद व प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार!  

धन्यवाद !

पौर्णिमा ढेरे

Comments

Popular posts from this blog

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Perfectly imperfect?

दृष्टिकोन