स्पर्श

पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक म्हणजे त्वचा. नेत्रहीनांना जगाशी जोडणारा दुवा ...स्पर्श ...वयात येणाऱ्या मुलींना मात्र अनेकदा जगणे नकोसा करणारा अनुभव ठरतो.

गॅजेट्सच्या  डोळे खिळवून ठेवणाऱ्या दुनियेत स्पर्शाची खरी अनुभूती आणि ताकद आपण विसरत चाललोय असे वाटून जाते ......

स्पर्श हवा तो गद्गदविणारा 
चित्ती प्रेम ठसविणारा 
या जगण्यातील दुःख यातना 
शांत करून संपविणारा 

स्पर्श हवा तो शीतल प्रेमळ 
वृत्ती विकार थोपविणारा 
खदखदते मेंदूचे दालन 
रिक्त करून एकवटविणारा 

स्पर्श हवा तो आश्वासक 
धीर आधारही देणारा 
या जगाचे न अपेक्षिलेले 
नकोसे स्पर्शही पुसणारा 

स्पर्श हवा तो प्रेरक 
नव्या दृष्टी जागविणारा 
विश्वाच्या खऱ्या सीमा 
अन प्रतिमा दर्शविणारा 

पौर्णिमा ढेरे 

Comments

Popular posts from this blog

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Perfectly imperfect?

दृष्टिकोन