अव्यक्त!

जे उरात उरते अशी काहीशी शाळेतील कवितेची ओळ आठवते . शब्दातून बाहेर पडूनही उरात उरणाऱ्या भावना हेच  कवितेचे जन्मस्थान असे कवीला सांगायचे होते.

असंख्य शब्दांच्या अशक्य कल्लोळांती दडून राहिलेले अव्यक्त हेच खरेतर पुढील वाटचालीचे पाठबळ आहे!

अश्या अनेक अव्यक्तांच्या  व्यक्त स्वरूपास सामोरे गेल्याने ही  कुपी सार्वजनिक करावी असे वाटले. उलगडण्याचा ज्याच्यात्याच्या निराळ्या पद्धती असल्या तरी मनात दडलेल्या  भावनांचे रुजलेले बीज सारखेच भासले.

निसर्गदत्त विविधतेने नटलेल्या दुनियेतील प्रतिध्वनी शोधण्यासाठी हा सारा खटाटोप. भावला तर जरूर कळवा.....


पौर्णिमा ढेरे

Comments

Popular posts from this blog

Perfectly imperfect?

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Crowded Solitude