दृष्टिकोन
चतकोरच तो चंद्र होता,
चतकोरच चांदणे ही होते.
जगण्याचे हे माझे सारे
आयामही चतकोरच होते.
काठावरती डोहाच्या या
पाय बुडवुनी बसलो होतो;
खोलीच्या अनुमानाकरिता
अंदाजही ना सुचले होते.
मिरवणुकीच्या ताशांवरती
जरी कसनुसे डोलत होतो;
मुक्त उधळूनी भीड तरी मन
ताल धराया कचरत होते.
सळसळणारे वारे जरी हे
पिसे फुलवुनी सुचवित होते;
साथ घेऊनी त्याच्या उडण्या
पंख तरी ना धजवत होते.
वळणावरच्या शिखरावरचा
झरा खळाळूनी खुणवीत होता.
स्क्रोलिंगवाल्या रिळातुनि तेव्हा
कारंजे मज हसले होते.
दृष्टिकोन 2
चतकोरच तो चंद्र होता
चतकोरच चांदणे ही होते,
तरीही धुंदित मनावरी या
गारुड काही औरच होते.
काठावरूनी डोहाच्या ना
पाय बुडवूनी विचार केला.
सूर मारुनी तळ गाठाया
खोल श्वास आसुसले होते.
वरातीतही रस्त्यावरच्या
'मूड सेटर' बनलो होतो.
रेंगाळलेले घोडे तेव्हा
व्हाईबने थरथरले होते.
वारे कुठले कसे वाहती
कुणा काळजी कसली भीती.
शीड माझिया नावेवरचे
फडफडण्या आतुरले होते
वळणावरती कुठल्याही ना
दिशा शोधण्या बसलो होतो.
अदृश्यातून अवतारणारे
शिखर सतत खुणावत होते.
पौर्णिमा ढेरे

ही कविता म्हणजे अंतर्मनाच्या दोन आरश्यांतलं अद्भुत प्रतिबिंब—एक भीती आणि संकोचाचा, तर दुसरा धुंद आणि धैर्यवान दृष्टिकोनाचा. चतकोर चंद्र, डोह, वारे, शिखर, कारंजे—या प्रतिमा फक्त दृश्य नाहीत, तर मनाच्या प्रवाहाला दिशा देणाऱ्या जिवंत अनुभूती आहेत.
ReplyDeleteपहिल्या दृष्टिकोनातला शांत, संथ, आत्मपरीक्षण करणारा स्वर आणि दुसऱ्या दृष्टिकोनातला मुक्त, निर्भय, व्हाईबवर झुलणारा आत्मविश्वास—दोन्ही एकमेकांना पूरक वाटतात. जीवनाच्या दोन टोकांवरची ही शब्दयात्रा अतिशय कलात्मकरीत्या रेखाटली आहे.
कवीयित्रीची विशेष ताकद म्हणजे – अंतर्मनाच्या सूक्ष्म हालचालींना सहज, देखण्या आणि आशयगर्भ प्रतिमांद्वारे पकडण्याची विलक्षण क्षमता. शब्दांतली लय, प्रतिमांची नेमकाई, आणि भावनांची खोली… हे सर्व मिळून ही कविता एक अनुभव बनते—वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणारा.
अशा संवेदनशील, प्रगल्भ आणि रेखीव लिखाणासाठी लेखकाला मनापासून सलाम. 👏✨
ही कविता म्हणजे मनाच्या दोन्ही पैलूंचं काव्यमय द्वंद्व—आणि त्याचा सुंदर ‘समतोल’.
धन्यवाद 🙏
DeleteDonhi mast ahet
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteखूप कविता आहे..
ReplyDeleteनक्कीच खूप सहज रित्या मांडल्या आहेत माझ्यातले ' मी आणि एक भीतीचा व दुसरा बिंधास्त, बेभान लपलेला दृष्टीकोन ' . जणू मीच तिथे आहे याचा असे वाटत होते...नक्कीच कवयत्रीचे खूप खूप कौतुक....
धन्यवाद विक्रांत 😊
Deletetranquil and beautiful
ReplyDeleteThank you 🙏
Deleteभावना अभिव्यक्तीची ही नवीन कल्पना आवडली ! भावनांची घालमेल होतेच पण शेवटी कृतीत काय उतरते हे ही महत्वाचे. विजय दुसर्या दृष्टिकोनाचाच झाला असावा ज्यामुळे कविमनाला भावनांच्या तळाशी जाण्यासाठी स्वत:ला झोकून देऊन ही कविता रचता आली !!
ReplyDeleteधन्यवाद सर 🙂
Deleteभावनांच्या अशा प्रकारच्या अभिव्यक्तीची कल्पना खूप आवडली. भावनांची घालमेल होतेच पण शेवटी कृतीत काय उतरते हे ही महत्वाचे. विजय दुसर्या दृष्टिकोनाचाच झाला असावा ज्यायोगे कविमनाला भावनांचा तळ गाठण्यासाठी स्वत:ला झोकून देऊन ही कविता रचता आली !!
ReplyDelete