दृष्टिकोन
पुन्हा ब्लॉगवर भेटून खूप छान वाटतंय. तुमच्या कंमेंट्स, प्रतिसादामुळे प्रोत्साहनही मिळतंय. अशीच ब्लॉगला भेट देत राहा. प्रत्येकात दोन 'मी' दडलेले असतात. हे दोन 'मी' मला काल अचानक कवितेत भेटले. तुम्हाला कोणता 'मी' रुचतोय सांगा मला. 😊 चतकोरच तो चंद्र होता, चतकोरच चांदणे ही होते. जगण्याचे हे माझे सारे आयामही चतकोरच होते. काठावरती डोहाच्या या पाय बुडवुनी बसलो होतो; खोलीच्या अनुमानाकरिता अंदाजही ना सुचले होते. मिरवणुकीच्या ताशांवरती जरी कसनुसे डोलत होतो; मुक्त उधळूनी भीड तरी मन ताल धराया कचरत होते. सळसळणारे वारे जरी हे पिसे फुलवुनी सुचवित होते; साथ घेऊनी त्याच्या उडण्या पंख तरी ना धजवत होते. वळणावरच्या शिखरावरचा झरा खळाळूनी खुणवीत होता. स्क्रोलिंगवाल्या रिळातुनि तेव्हा कारंजे मज हसले होते. दृष्टिकोन 2 चतकोरच तो चंद्र होता चतकोरच चांदणे ही होते, तरीही धुंदित मनावरी या गारुड काही औरच होते. काठावरूनी डोहाच्या ना पाय बुडवूनी विचार केला. सूर मारुनी तळ गाठाया खोल श्वास आसुसले होते. वरात...