Posts

Showing posts from September, 2018

शोध

Image
जगाच्या फायद्यानुसार बदलत्या अभिकेंद्री, अपकेंद्री बलाशी सामना करताना आपल्यातील निरागसता निखळता कधीच लोप पावते. आक्रमण जेवढे जोरदार तेवढेच  तुंबळ युद्ध मनातही पेटलेले असते. प्राधान्य, मूल्य, तत्वे पोकळ वाटू लागतात. ध्येय, उद्दिष्टे निखळतात. त्यांवर स्थिरावणाऱ्या डोळ्यांतील  चमक नाहीशी होते. आरशातील चेहराही बदलल्यासारखा वाटतो. अशावेळी आपल्यातल्या  हरवलेल्या 'स्व'ला  शोधण्याचे नवनवे मार्ग हुडकावे लागतात.      डोकावतेय भूतकाळात जुन्या फोटोंतून शोधतेय स्वतःलाच कुठं हरवलाय मी माझा चेहरा..    चेहऱ्यावरच्या रेघा करतायत स्पष्ट काहीतरी होते माझ्याबरोबर जे  आज.. आत्तापर्यंत..   अचानक आताशाच  ते हरवलंय गमावलंय कि जाणवतोय मला  माझाच चेहरा इतका भकास..    निस्तेज डोळे  दिशाहीन नजर  शोधतेय कुठे आहेत  माझ्याच अस्तित्वाच्या खुणा..    माझ्यातलीच मी म्हणतेय मला  दिसतेय डोळ्यात तुझ्या  तू स्वीकारलेली हार..    खचलेलं ...